रस्त्यावर कोठेही वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करताना दिसत नाही, सिग्नल बंद असल्यामुळे तर वाहतूक नियोजनाचे बारा वाजले असून काही चालक सुसाट आहेत. शहरातील वाहतुकीला पोलिसांनी शिस्त लावण्याची मागणी केली जात आहे. ...
मार्च महिन्यामध्ये लॉक डाऊन जाहीर झाल्यापासून नाशिक महापालिकेची महासभा होऊ शकलेली नाही चालू महिन्यात महापौरांनी महाकवी कालिदास कलामंदिरात सभा घेण्याचे नियोजन केले होते मात्र त्यास नगरसेवकांनी विरोध केला ...
शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्यानंतर त्यात पूर्वदक्षता घेऊन कोरोनावर मात करण्यासाठी महापालिकेने एक पाऊल पुढे टाकले आणि एकही संशयित रुग्ण झोपडपट्टी परिसरात किंवा अन्यत्र असू नये यासाठी आरोग्य विभागाने शोधमोहीम राबविण्यास सुरुवात केली. त्यातून ...
महापालिकेचे गंगापूर धरण येथील रॉ वॉटर पंपिंग स्टेशन येथे पावसाळापूर्व विद्युत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे मुकणे धरण पंपिंग स्टेशन परिसरातील देखील कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे शनिवारी (दि. ३०) संपूर्ण शहरात दुपारी व सायंकाळी ...
महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने दरवर्षीच महिला प्रशिक्षणात होणारे गोंधळ आणि संशयास्पद प्रकार बघितल्यानंतर दोन वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रशिक्षणाची योजना गुंडाळली होती. मात्र, आता पुन्हा ती सुरू करण्यात येणार आहे. प्रशासना ...
कोरोनाच्या संकटामुळे महापालिकेला घरपट्टीची बिले प्रत्यक्ष मिळकतधारकाला देता येणार नसल्याने आॅनलाइनचा पर्याय वापरण्याचे आवाहन करण्यात आले खरे, परंतु बंद उद्योगधंद्यामुळे त्यातही गतवर्षीच्या तुलनेत २ कोटी ९० लाख रुपयांची घट आली आहे. ...
कोरोनाच्या संकटामुळे महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर प्रतिकूल परिणाम झाला असताना सलग दुसऱ्या महिन्यात केंद्र सरकारने कृपावंत होऊन जीएसटीच्या हिश्श्यापोटी ८४ कोटी रुपये पाठविले आहेत. त्यामुळे किमान वेतनाचा प्रश्न मिटला आहे. ...