बिबट हल्ला : छगन भुजबळ, गोडसे यांनी वनखात्याकडून घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 02:50 PM2020-05-31T14:50:26+5:302020-05-31T15:01:44+5:30

मानव-बिबट संघर्ष उफाळून येणार नाही, याबाबत दक्षता घेण्यासंदर्भात त्यांची काही सुचनाही केल्या.

Review by Bhujbal, Godse from Forest Department | बिबट हल्ला : छगन भुजबळ, गोडसे यांनी वनखात्याकडून घेतला आढावा

बिबट हल्ला : छगन भुजबळ, गोडसे यांनी वनखात्याकडून घेतला आढावा

googlenewsNext
ठळक मुद्देप्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागणारभुजबळ यांनी फुले यांच्याशी संपर्क करत परिस्थिती जाणून घेतली.

नाशिक : इंदिरानगरच्या घटनेत दोघा इसमांना बिबट्याने जखमी केले, सुुदैवाने जीवीतहानी टळली. यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिक पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांच्याशी संवाद साधत बिबट्याचा लोकवस्तीत वावर रोखण्यासाठी कशाप्रकारे प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागणार याबाबत चर्चा केली.
बिबट्यांचा वावर शहराच्या थेट लोकवस्तीपर्यंत होऊ लागल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरणे सहाजिकच आहे. इंदिरानगरला शनिवारी झालेल्या बिबट हल्ल्याच्या घटनेनंतर भुजबळ यांनी फुले यांच्याशी मोबाईलवरून संपर्क करत परिस्थिती जाणून घेतली. मानव-बिबट संघर्ष उफाळून येणार नाही, याबाबत दक्षता घेण्यासंदर्भात त्यांची काही सुचनाही केल्या. दरम्यान, दुपारी गोडसे यांनी फुले यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. हिंगणवेढे, दोनवाडे गावात बिबट हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या मुलांच्या घटनांपासून इंदिरानगरच्या घटनेपर्यंत सगळ्याच मुद्यांवर गोडसे यांनी चर्चा करत बिबट-मानव संघर्ष जिल्ह्यात कसा टाळता येऊ शकेल? यासाठी केंद्र सरकारकडून कशी मदत घेऊन कसा तोडगा काढता येईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, रात्री गोविंदनगर, कर्मयोगीनगर, पांगरे मळा या भागात बिबट्या संचाराची आवई उठली. यानंतर पुन्हा भुजबळ यांनी फुले यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून याबाबत सत्यता जाणून घेत या भागात गस्त करण्याची सुचना केली. यानुसार वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, दक्षता पथकाचे एम.बी.पाटील यांनी वनरक्षकांसमवेत परिसरात गस्त करून बिबट संचाराबाबत खात्री करण्याचा प्रयत्न केला; मात्र या भागात बिबट वावरचा कुठल्याही संशयास्पद बाबी आढळून न आल्याने नागरिकांचा जीव भांड्यात पडला.

 

 

 

 

 

 

Web Title: Review by Bhujbal, Godse from Forest Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.