निर्बंध शिथिल : शहरातील सर्वच रस्त्यावर वाहनांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 08:50 PM2020-05-29T20:50:46+5:302020-05-29T20:51:32+5:30

रस्त्यावर कोठेही वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करताना दिसत नाही, सिग्नल बंद असल्यामुळे तर वाहतूक नियोजनाचे बारा वाजले असून काही चालक सुसाट आहेत. शहरातील वाहतुकीला पोलिसांनी शिस्त लावण्याची मागणी केली जात आहे.

Restrictions relaxed : Traffic congestion on all roads in the city | निर्बंध शिथिल : शहरातील सर्वच रस्त्यावर वाहनांची गर्दी

निर्बंध शिथिल : शहरातील सर्वच रस्त्यावर वाहनांची गर्दी

Next
ठळक मुद्देबेशिस्त वाहतूक, त्यात अडथळ्यांची भर

नाशिक : कोरोनामुळे लादलेले निर्बंध शिथिल केल्याने शहरातील सर्वच रस्त्यावर वाहनांची गर्दी होऊ लागली असून, रस्त्यावरील स्वनचलीत सिग्नल बंद असल्यामुळे बेशिस्त वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. अनेक रस्त्यावर त्यामुळे लहानमोठे अपघात तसेच वादविवादाच्या घटना घडू लागल्या आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने 23 मार्च पासून लॉक डाऊन व संचारबंदी जारी केल्याने अत्यावश्यक सेवेची वाहने वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना मज्जाव करण्यात आला होता, त्यामुळे शहरातील सर्वच रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्गावरील वाहतूक थंडावून रस्ते सामसूम झाले होते, रस्त्यावर वाहनच नसल्याने शहर वाहतूक शाखेने स्वनचलीत सिग्नल यंत्रणाही बंद केली, एरवी वाहनांची गर्दी, हॉर्न च्या गोंगात्याने गजबजून जाणारे रस्ते जवळपास एक महिनाभर शांत झाले होते, तथापि लॉक डाऊन चा तिसऱ्या टप्प्यात केंद्र व राज्य सरकारने संचारबंदी शिथिल केली, त्याच बरोबर लहानमोठे उद्योग, व्यवसाय सुरू करण्याची अनुमती दिली, परिणामी जनजीवन पूर्व पदावर येण्यास सुरुवात होऊन रस्त्यावर वाहने धावू लागली आहेत, मात्र प्रत्येकालाच घाई असल्यागत वाहने दामटवली जात असल्याने वाहतूक विस्कळीत होण्याची व वाहनांची कोंडी होण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यातून लहान मोठे अपघात, वाहनचालकांची हमरीतुमरीच्या घटना घडू लागल्या आहेत, हा सारा प्रकार शहरातील प्रत्येक रस्त्यावर घडत असताना मात्र रस्त्यावर कोठेही वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करताना दिसत नाही, सिग्नल बंद असल्यामुळे तर वाहतूक नियोजनाचे बारा वाजले असून काही चालक सुसाट वेगाने वाहन हाकत आहेत. शहरातील वाहतुकीला पोलिसांनी शिस्त लावण्याची मागणी केली जात आहे.

बेशिस्त वाहतूक, त्यात अडथळ्यांची भर
शहरात वाहतुकीचे तीन तेरा वाजलेले असताना त्यात पोलीस यंत्रणेने अनेक मार्गावर कोरोनाच्या निमित्ताने अडथळे उभे केले आहेत, काही रस्ते अंशतः खुली आहेत तर काही पूर्ण बंद आहेत, त्यामुळे देखील अन्य पर्यायी रस्त्यावर वाहतुकीचा ताण पडून त्यातून वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण घडत आहे. शहर जर सरकारच्या आदेशाने व्यवसाय व उद्योगासाठी खुले केले आहे तर रस्ते कोणाच्या आदेशाने बंद आहेत असा सवाल केला जात आहे.

 

Web Title: Restrictions relaxed : Traffic congestion on all roads in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.