नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेने दोन वेळा कारवाई करूनसुद्धा मुंबई नाका येथील उड्डाणपुलाखाली गजरा विक्रेत्यांचे अतिक्रमण ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ...
शिक्षण समितीवर भाजपाचे पाच, सेनेचे तीन व एक कॉँग्रेसचा सदस्य असल्याने साहजिकच भाजपाचा वरचष्मा असला तरी, सेनेने ही निवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून सुदाम डेमसे यांना सभापतिपदाची उमेदवारी दिली होती. ...
रविशंकर मार्गाच्या टी-पॉइंटवरील वाहतूक बेटापासून पुढे डीजीपीनगर, विघ्नहरण गणेश मंदिरापर्यंतचे पथदीप बंद असल्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य कायम आहे ...
महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बंद केलेल्या १३६ आंगणवाड्यांच्या फेरसर्वेक्षणाचे आदेश विद्यमान आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. त्यामुळे या अंगणवाड्या सुरू होण्याची शक्यता वाढली आहे. ...
पूर्व प्रभाग सभेत स्वच्छता आणि उद्यान या दोन विषयांवर प्रशासनाला सदस्यांनी धारेवर धरले होते तसेच उद्यानाची देखभाल होत नसेल तर संबंधित ठेकेदारास बिल न देण्याचे सदस्यांनी मागणी केली. ...