मुस्लिम समाजाचे तुष्टीकरण आता खूप झाले. यापुढे मुस्लिम समाजाला शैक्षणिकच काय तर कुठलेही आरक्षण मिळू देणार नाही. वेळ पडली तर रस्त्यावर उतरू, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त राष्ट्रीय महामंत्री सुरेंद्र जैन यांनी येथे दिला. ...
काँग्रेसचे आमदार डॉ. वजाहत मिर्झा, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ख्वाजा बेग यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मलिक यांनी ही घोषणा केली. मुस्लीम समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ...
याआधी आघाडी सरकारने 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली होती. त्यासाठी अध्यादेशही जारी करण्यात आला होता. मात्र ते आरक्षण नवीन सरकारच्या काळात कायम राहिले नाही. ...