टीव्हीवर प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘महाभारत’ या मालिकेत पितामह भीष्माची भूमिका साकारणारे अभिनेता मुकेश खन्ना यांनी आपल्या अभिनयाने सर्वांच्याच मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘शक्तिमान’ या मालिकेमुळे मुकेश खन्ना टेलिव्हिजनवरील बच्चेकंपनीचे आवडते सुपरहिरो बनले आणि घराघरात पोहोचले. त्यापूर्वी भीष्म पितामह सारखी कर्मठ भूमिका साकारून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.सौगंध,तहलका, बेताज बादशाह आणि सौदागर अशा काही चित्रपटांतही त्यांनी काम केले. परंतु १९८०च्या दशकात बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ने मुकेश खन्ना यांनी एक वेगळीच उंची गाठली. त्यानंतर १९९७ मध्ये आलेल्या ‘शक्तिमान’ मालिकेतून त्यांनी साकारलेला ‘शक्तिमान’ आणि ‘गंगाधर’ या व्यक्तिरेखा आजही अनेकांच्या मनात कायम आहे. Read More
Mukesh Khanna: मुकेश खन्ना आज ६५ वर्षांचे आहेत या काळात यांनी यश, प्रसिद्ध, संपत्ती सारं काही कमावलं. मात्र, अजूनही लग्न केलं नाही. त्यामुळे त्यांचे चाहते कायम त्यांना याविषयी प्रश्न विचारत असतात. ...
mukesh khanna: झीनत अमान यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी तरुणांना लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या या सल्ल्यावर मुकेश खन्ना यांनी आक्षेप घेतला आहे. ...
'शक्तिमान'वर सिनेमा येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. तर या सिनेमात रणवीर सिंह शक्तिमानच्या भूमिकेत दिसणार आहे. यावर आता मुकेश खन्ना यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...