'बोलतांना जरा भान राखा'; झीनत अमान यांच्या 'त्या' वक्तव्यावर मुकेश खन्ना यांची आगपाखड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 02:04 PM2024-04-21T14:04:43+5:302024-04-21T14:05:33+5:30

mukesh khanna: झीनत अमान यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी तरुणांना लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या या सल्ल्यावर मुकेश खन्ना यांनी आक्षेप घेतला आहे.

mukesh-khanna-angry-after-hearing-zeenat-amans-comment-of-live-in-relationshipmukesh-khanna-angry-after-hearing-zeenat-amans-comment-of-live-in-relationship | 'बोलतांना जरा भान राखा'; झीनत अमान यांच्या 'त्या' वक्तव्यावर मुकेश खन्ना यांची आगपाखड

'बोलतांना जरा भान राखा'; झीनत अमान यांच्या 'त्या' वक्तव्यावर मुकेश खन्ना यांची आगपाखड

बॉलिवूड अभिनेत्री झीनत अमान (zeenat aman) सध्या सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी लिव्ह इन रिलेशनशीपविषयी भाष्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याची कलाविश्वात बरीच चर्चा झाली. अनेक कलाकारांनी झीनत यांच्या वक्तव्याचा विरोध केला असून त्यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री मुमताज (Mumtaz) यांनी  या प्रकरणी त्यांचं मत मांडलं होतं. त्यानंतर आता अभिनेता मुकेश खन्ना (mukesh khanna) यांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वी झीनत अमान यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी तरुणांना लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या या सल्ल्यावर मुकेश खन्ना यांनी आक्षेप घेतला आहे.

नेमकं काय म्हणाले मुकेश खन्ना?

अलिकडेच मुकेश खन्ना यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी झीनत अमान यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे. झीनत अमान सुरुवातीपासूनच पाश्चात्य संस्कृतीनुसार जीवन जगत आहेत. आपल्या संस्कृतीमध्ये आणि इतिहासात कुठेही लिव्ह इन रिलेशनशीपला मान्यता नाही. ते वेस्ट्रन सिव्हिलायझेशनमधून आलं आहे. झीनत अमान कायम वेस्टर्न सिव्हिलायझेशननुसार आयुष्य जगल्या त्यामुळे त्या तसं बोलल्या. लग्नाशिवाय एक मुलगा-मुलगी पती-पत्नी म्हणून एकत्र राहणं मान्य नाही. त्यामुळे असं विधान करण्यापूर्वी त्यांनी भान राखलं पाहिजे, विचारपूर्वक बोलायला हवं, असं मुकेश खन्ना म्हणाले.

दरम्यान, मुकेश खन्ना यांच्यापूर्वी मुमताज यांनीही झीनत अमान यांच्या वक्तव्याचा विरोध केला होता. स्वत:ला कुल आंटी दाखवायच्या नादात तिने हे वक्तव्य केलं आहे, असं त्या म्हणाल्या होत्या. विशेष म्हणजे त्यांच्या या वाक्यावर झीनत अमान यांनीही मुमताज यांना चोख प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळालं.

Web Title: mukesh-khanna-angry-after-hearing-zeenat-amans-comment-of-live-in-relationshipmukesh-khanna-angry-after-hearing-zeenat-amans-comment-of-live-in-relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.