"न्यूड फोटोशूट करून...", 'शक्तिमान'च्या भूमिकेसाठी रणवीरची निवड केल्यानंतर भडकले मुकेश खन्ना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 11:39 AM2024-03-18T11:39:40+5:302024-03-18T11:40:23+5:30

'शक्तिमान'वर सिनेमा येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. तर या सिनेमात रणवीर सिंह शक्तिमानच्या भूमिकेत दिसणार आहे. यावर आता मुकेश खन्ना यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

mukesh khanna angry reaction on ranveer singh casting for shaktiman movie | "न्यूड फोटोशूट करून...", 'शक्तिमान'च्या भूमिकेसाठी रणवीरची निवड केल्यानंतर भडकले मुकेश खन्ना

"न्यूड फोटोशूट करून...", 'शक्तिमान'च्या भूमिकेसाठी रणवीरची निवड केल्यानंतर भडकले मुकेश खन्ना

९०च्या दशकात टीव्हीवर गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे 'शक्तिमान'. संकटात अडकलेल्या लोकांची मदत करण्यासाठी धावून येणारा हा 'शक्तिमान'च खरा ९० मधील मुलांसाठीचा पहिला सुपरहिरो होता. लाल सूटमध्ये दिसणाऱ्या आणि स्पेशल पॉवर असणाऱ्या या शक्तिमानने सगळ्यांच्या मनात घर केलं होतं. अभिनेता मुकेश खन्ना 'शक्तिमान'ची भूमिका अजरामर केली होती. आता हा शक्तिमान मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. 'शक्तिमान'वर सिनेमा येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. तर या सिनेमात रणवीर सिंह शक्तिमानच्या भूमिकेत दिसणार आहे. यावर आता मुकेश खन्ना यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

सिनेमामध्ये शक्तिमानच्या भूमिकेसाठी रणवीर सिंहची निवड केल्याने मुकेश खन्ना नाराज आहेत. याबाबत त्यांनी युट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी रणवीरच्या न्यूड फोटोशूटवरुन त्याला सुनावलं आहे. रणवीर सिंह स्टार असला तरी तो कधीच शक्तिमान बनू शकत नाही, असं मुकेश खन्ना म्हणाले. "जर त्याला शरीरप्रदर्शन करायचं असेल, तर त्याने दुसऱ्या देशात जाऊन अभिनय केला पाहिजे. फिनलँड किंवा स्पेनसारख्या देशात जाऊन तू राहा. तिथे हे सगळं चालतं. तिथल्या सिनेमांमध्ये तुला न्यूड सीन करायला मिळतील," असं म्हणत त्यांनी रणवीरवर टीका केली आहे. 

पुढे ते म्हणाले, "न्यूड फोटोशूट करून स्मार्ट आहे असं वाटत असेल तर याच्यापासून सावध राहा. सर्व शक्तिमान भगवान आहेत. मी निर्मात्यांनी हे सांगितलं आहे की तुमची स्पर्धा स्पायडर मॅन, बॅटमॅन, कॅप्टन प्लॅनेटबरोबर नाहीये. शक्तिमान केवळ एक सुपरहिरो नाही तर तो एक सुपर टीचरही आहे. हे तेच अभिनेते करू शकतात, जे तुम्ही सांगाल ते ऐकतील. जर माझ्या नजरेत असं कोणी असतं तर मी कधीच सिनेमा केला असता. " 

"जर शक्तिमान सिनेमा बनवला गेला तर त्याला शक्तिशाली असावं लागेल. शक्तिमान ब्रह्मांडमध्ये सगळ्यात मजबूत आहे. त्याच्याकडे सगळं काही आहे. त्यामुळे अभिनेत्याची शरीरयष्टी चांगली असणं महत्त्वाचं आहे. जर सिनेमा चालला तर तो कंटेटमुळे चालेल. कोणत्याही सुपरस्टारमुळे नाही," असंही ते पुढे म्हणाले. 

Web Title: mukesh khanna angry reaction on ranveer singh casting for shaktiman movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.