मेट गाला याला औपचारिकरित्या ‘कॉस्च्युम इन्स्टिट्यूट गाला’ म्हटले जाते. ‘मेट बॉल’ या नावानेही या इव्हेंटला ओळखले जाते. न्यूयॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझिअम आॅफ आर्टच्या कॉस्च्युम डिझाईन इन्स्टिट्यूटसाठी निधी उभारण्यासाठी दरवर्षी हा इव्हेंट आयोजित केला जातो. त्या वर्षाच्या कॉस्च्युम इन्स्टिट्यूट प्रदर्शनाच्या थीमनुसार साजरा होणारा हा इव्हेंट म्हणजे एक फॅशन उत्सव मानला जातो. जगभरातील ललना या उत्सवात भाग घेतात. Read More