मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्याचे अध्यक्ष आबासाहेब पाटील हे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह हिंगणघाट जळीत कांडातील पिडीत तरुणीच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी दारोडा येथे आज आले होते. ...
राजमुद्रेचा झेंड्यावर वापर करण्यास सुरुवात केल्यास, राजमुद्रेचा अपमान होऊ शकतो. त्यामुळे भावना दुखावल्या जाऊ शकतात. तरी देखील मनसेकडून राजमुद्रा ध्वजावर घेतल्यास, कायदेशीर काय करता येईल ते पाहू असंही विनोद पाटील म्हणाले. ...
मराठा आरक्षणासाठी हुतत्मा झालेल्या मराठा बांधवाच्या कुटुंबातील एकाला नोकरी, 10 लाख रुपये आर्थिक मदत, अरबी समुद्रातील बहुचर्चित शिवस्मारकाच्या उभारणीसाठी प्रयत्न करावे, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. ...
वादग्रस्त पुस्तक लिहिणाऱ्या जयभगवान गोयल यांच्याविषयी बोलण्याऐवजी तुम्ही छत्रपती घराण्याविरुद्ध बोलत आहात. तुम्हाला वंशज असल्याचे पुरावे हवे असल्यास तुम्ही साताऱ्यात यावे, असंही आबा पाटील म्हणाले. ...
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेवर (सारथी) बाबत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे नाराज मराठा समाजाने शनिवारी उपोषणास प्रारंभ केला. ...