Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
युवकांनी आपले करिअर धोक्यात न घालता कोणत्याही वादग्रस्त पोस्ट पाठवणे, तयार करणे यापासून अलिप्त राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम व इतर सोशल साईटवर निवडणूक काळात आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणे बेकायदेशीर आहे. ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ भाजपच्या नाशिक जिल्ह्यातील चार आमदारांचे भवितव्य पुन्हा एकदा अंधारात सापडले आहे. भाजपाने दोन सर्व्हे निवडणुकीच्या तोंडावर केले असून, त्यातील निर्णयाच्या आधारे तब्बल २५ आमदारांना डच्चू मिळणार असल्याने ...
राज्यातील सर्व जागा लढविण्याची घोषणा करणाऱ्या वंचित आघाडीने नाशिकमधील एकाही उमेदवाराची अधिकृत घोषणा केलेली नाही. ज्यांची नावे इच्छुक म्हणून पुढे येत आहेत त्यांना पक्षाकडून अद्यापही शब्द देण्यात आला नसल्यामुळे वंचितच्या गोटात सध्यातरी शांतता जाणवत आहे ...
विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन नामांकन दाखल करण्यास अवघे पाच दिवस शिल्लक असतानाही भाजप-सेनेच्या युतीची अधिकृत घोषणा व त्याचबरोबर जागावाटपाची बोलणी पूर्ण होत नसल्याने दोन्ही पक्षांच्या इच्छुकांची घालमेल वाढली आहे. ...
विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने प्रशासनाने शहरातील वेगवेगळ्या शासकीय कार्यालयातील कोनशिला झाकण्यासह सत्ताधारी पक्षांचे छायाचित्र असलेल्या विविध सरकारी योजनांचे फलक लगोलग हटविले. ...
‘दार उघड बये दार उघड’ अशी साद आई जगदंबेला नाशिकच्या भूमित घालताच अवघ्या दीड वर्षावर येऊन ठेपलेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने घवघवीत विजयश्री खेचून आणली व राज्याच्या विधीमंडळावर खऱ्या अर्थाने भगवा फडकला. ...