दारूबंदी असलेल्या चंद्रपुरात रेल्वे मार्गाने दारूची तस्करी सुरूच असून सोमवारी रात्री १.५० वाजता रेल्वे सुरक्षा दलाने स्वर्णजयंती एक्स्प्रेसमधून बीअरच्या १२ हजार ९६० रुपये किमतीच्या ९६ बॉटल जप्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केल्या आहेत. ...
स्थानिक शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने आर्वी नाका परिसरात नाकेबंदी करून कारसह मोठ्या प्रमाणात विदेशी दारूसाठा असा एकूण १.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एका दारूविक्रेत्याला अटक केली आहे. ...
जिल्हा पोलिसांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी धाडसत्र राबवून अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाई केली. तसेच मोठ्या प्रमाणात अवैध दारुचा साठा जप्त केला. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे पदाधिकारी व सदस्य अवैध दारू विक्री करणाऱ्या विरुध्द कंबर कसल्याने त्याचा ...
तालुक्यातील बामणी उपपोलीस ठाण्यांतर्गत जाफ्राबाद गावातील परिवर्तन महिला बचत गटाच्या सदस्य व इतर महिलांनी पुढाकार घेऊन १५ मे रोजी सकाळी ६ वाजता पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने गावालगत धाडसत्र राबवून गूळ, मोहाचा सडवा नष्ट केला. ...
दारू बंदी असतानाही वर्धा जिल्ह्यात माजी सैनिक वगळता मागील वर्षभरात तब्बल १ हजार ६९१ सर्वसामान्य नागरिकांना दारू पिण्याचा तसेच दारूसाठा बाळगण्याचा अधिकृत परवाना देण्यात आला आहे. ...