तालुक्यातील उडेरा, बुर्गी, येमली, तुमरगुंडा तोडसा, शेवारी, मानेवाडा आणि गुरुपल्ली ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या २२ हून अधिक गावांनी ग्रामसभेत दारू आणि सुगंधी तंबाखूयुक्त खर्राबंदीचा ठराव घेत गावाला नशामुक्त करण्याचा ध्यास घेतला. ...
धानोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पण आरमोरी तालुक्यात येणाऱ्या वडेगाव (रांगी) येथील दारू विक्रेत्याच्या शेतातील अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून ३ लाख २४ हजार रुपयांचा दारूसाठा जप्त केला. विशेष म्हणजे ही दारू शेतातील धानाच्या तणसाच्या ढिगात लपवून ठेवली होत ...
तालुक्यातील बोरमपल्ली, व्यंकटापूर व बामणी येथील गाव संघटनांची कार्यशाळा बामणी येथे २८ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. छुप्या मार्गाने होत असलेल्या दारूविक्रीला आळा घालण्यासाठी अहिंसक कृतींवर भर देण्याचा निर्णय उपस्थित महिलांनी यावेळी घेतला. ...
येथील देशी दारुच्या दुकानातून दारु विकत घेवून गडचिरोली जिल्ह्याच्या वडसा येथे घेऊन जात असताना दीड लक्ष रुपयांची दारु पकडली. ही कारवाई गोंदिया येथील पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केली. या कारवाईमुळे अवैधरित्या दारु वाहून नेणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे ...
वलगावातील चांदूरबाजार रोडवर अवैध दारूगुत्त्यांमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. लहान मुले व्यसनांच्या विळख्यात अडकले असून, आत्महत्येची पाळी आपल्याच्या तीव्र प्रतिक्रिया महिलांनी दिल्या आहेत. ...
तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या आदिवासीबहुल जांभळी गावाने दारू व खर्रा विक्री पूर्णपणे बंद करण्यासाठी गुरुवारी २२ नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभा घेतली. या सभेत दारू व खर्रा बंदीचा ठराव सवार्नुमते पारित करण्यात आला. ...
शहर आणि ग्रामीण भागातील अवैध धंदे बंदे करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. यामुळे अवैध धंदे चालविणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणले आहे. मात्र दुसरीकडे शहरातील काही भागात सर्रापणे सट्टा व अवैध दारु विक्री सुरू आहे. ...