गोंदिया जिल्हा शंभर टक्के दारुबंदी होण्याच्या मार्गावर असून जिल्ह्यातील १६ पोलिस ठाण्यांच्या घेतलेल्या आढाव्यानुसार ११०१ गावांपैकी ८१० गावांमध्ये दारुबंदी करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. ...
गेल्या दहा महिन्यांत गोव्याहून विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांसह चालकांवर कारवाई करून सुमारे अडीच कोटी किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. ...
गावातील अवैध दारू विक्री धंद्याला कायमचे संपवायचे, या एकाच ध्यासाने येवली गावसंघटनेच्या बैठकीमध्ये सर्व महिला व पुरूष सदस्यांनी मिळून गावातील दारू विक्री बंद करण्याचा निर्णय केला. ...
दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारू तस्करीत अनेक हात गुंतले आहेत. एसटी बस ही यासाठी हक्काचे वाहन झाले आहे. चंद्रपूर आगाराच्या वाहकालाच दारू तस्करी करताना रंगेहात अटक करण्यात आली. ...
‘पाण्याचे बॉक्स आहे,’ असे सांगून कारमधून गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची विक्री करणाऱ्या सावर्डे-पाटणकर (ता. राधानगरी) येथील दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडले. ही कारवाई बिद्री-सोनाळी रस्त्यावर सापळा रचून केली. ...
लकडगंज पोलिसांनी एका माजी नगरसेवकाच्या जावयाच्या इशाऱ्यावर दारू तस्करी करणाऱ्या टोळीस पकडले आहे. पोलिसांनी या टोळीसाठी कुरिअरचे काम करणाऱ्या दोन युवकांना अटक करीत कारसह सव्वातीन लाखाचा माल जप्त केला. ...