लक्ष्मण हाके- Laxman Hakeलक्ष्मण हाके हे ओबीसी नेते असून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावचे रहिवासी आहेत. पुणे विद्यापीठातून त्यांनी एमएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात काही दिवस अध्यापनाचे कामही त्यांनी केले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाके यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवली. दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मराठा समाजास वेगळे आरक्षण देऊन ओबीसी आरक्षण सुरक्षित राहावे या मागणीसाठी हाके यांनी अंतरवाली सराटी गावाजवळ वडीगोद्री येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. Read More
सरकारच्या शिष्टमंडळाने मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मुंबईत चर्चेचे निमंत्रण दिले आहे. त्यानुसार हाके यांचे ओबीसी शिष्टमंडळ आज सायंकाळी मुंबईत राज्य सरकारसोबत चर्चा करणार आहे. ...
जालना येथे लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे हे उपोषणकर्ते गेल्या ८ दिवसांपासून ओबीसी आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. त्यांच्या भेटीला ओबीसी समाजातील विविध नेते पोहचत आहे. ...
लोकसभा निवडणुकीत ओबीसी उमेदवारांच्या पराभवासाठी जरांगेंनी बैठका घेतल्या आणि तेच आता दलित, मुस्लीम, मराठा यांना एकत्रित करून निवडणूक लढण्याची भाषा करतायेत असा आरोप लक्ष्मण हाकेंनी केला आहे. ...
ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये, या प्रमुख मागणीसाठी इतर कुणालाही ओबीसीतून आरक्षण देवू नये, यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे वडीगोद्री येथे उपोषणाला बसले आहेत. ...