लक्ष्मण हाके- Laxman Hakeलक्ष्मण हाके हे ओबीसी नेते असून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावचे रहिवासी आहेत. पुणे विद्यापीठातून त्यांनी एमएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात काही दिवस अध्यापनाचे कामही त्यांनी केले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाके यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवली. दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मराठा समाजास वेगळे आरक्षण देऊन ओबीसी आरक्षण सुरक्षित राहावे या मागणीसाठी हाके यांनी अंतरवाली सराटी गावाजवळ वडीगोद्री येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. Read More
बारामतीच्या इशाऱ्यावर आंदोलन करणाऱ्या जरांगे यांनी त्यांच्या बॅनरवर तुतारीच चिन्ह टाकावे अशी जहरी टिका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर केली. ...
Laxman Hake Tauts Manoj Jarange Patil: मनोज जरांगेच्या बॅनरवर फुले-शाहू-आंबेडकरांचा फोटो लागलेला दिसतो का, असा थेट सवाल लक्ष्मण हाके यांनी केला आहे. ...
OBC Leader Laxman Hake News: आंतरवली सराटीपासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वडीग्रोदी येथे उपोषणाला बसण्याची तयारी लक्ष्मण हाके यांनी केल्याचे सांगितले जात आहे. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फक्त मराठा जातीचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना या निवडणुकीत ओबीसीची ताकद दिसेल, असे सांगत लक्ष्मण हाके यांनी मनोज जरागेंचं उपोषण सुरू होताच, आपणही उपोषण सुरू करणार असल्याचे म्हटले आहे. ...