लक्ष्मण हाके- Laxman Hakeलक्ष्मण हाके हे ओबीसी नेते असून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावचे रहिवासी आहेत. पुणे विद्यापीठातून त्यांनी एमएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात काही दिवस अध्यापनाचे कामही त्यांनी केले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाके यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवली. दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मराठा समाजास वेगळे आरक्षण देऊन ओबीसी आरक्षण सुरक्षित राहावे या मागणीसाठी हाके यांनी अंतरवाली सराटी गावाजवळ वडीगोद्री येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: जत्रा भरवणे सोपे असते, निवडणूक लढवणे नाही. आंदोलनात हजार पाचशे लोक असले तरी चालून जाते. मात्र राजकारणात लोकांची गोळाबेरीज करावी लागते, असे सांगत लक्ष्मण हाके यांनी जरागेंवर टीका केली. ...
Maharashtra Assembly Election 2024 OBC Vs Maratha Reservation News: मनोज जरांगे सुपारीबाज नेते आहेत. मविआच्या अजेंड्यावर चालतात, अशी टीका करत, शरद पवारांच्या तुतारीला एकही मतदान ओबीसींचे जाणार नाही, असा दावा लक्ष्मण हाकेंनी केला. ...