Kolhapur Flood News And Updates in Marathi: कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. Read More
कोल्हापूर जिल्हात पुराने हाहाकार माजला आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्याने बजरंग कोंडीबा पाटील यांनी आपल्या स्वतःच्या शेतातील एकर उभे ऊस पीक कापून चारा पुरविला आहे. हा ऊस रुई,चंदुर,पारगाव येथे पाठविण्यात आला आहे. ...
महापुरासारख्या संकटात ही लोकांचे अश्रू पुसण्यापेक्षा सत्ताधारी मंत्री पक्षाच्या बैठकीत मग्न आहेत अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी येथे केली. ...
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासन त्यांच्या पाठीशी आहे. येथील पूरग्रस्त गावांचं पुनर्वसन करण्याची केंद्रीय अर्थ मंत्र्यांकडे मागणी करणार आहे, असे सांगून माझ्या खासदार फंडातून पूरग्रस्तांसाठी ५० लाखां ...
आजरा शहरात पावसामुळे प्रत्येक गल्लीतील मस्जीदीमध्ये नमाज पठण करण्यात आले. महापुराच्या अस्मानी संकटामुळे यंदा ईद साधेपणाने साजरी करण्यात आली. अनावश्यक खर्च टाळून पूरग्रस्तासाठी रोख रक्कम जमा करण्यात आली. ...
आजरा तालुक्यातील वझरेनजीकचा शिवबाच्या राईचा ‘कडा’ भेगा पडून खचल्याने वझरे, खोतवाडी, पेरणोलीपैकी नावलकरवाडीसह भुदरगडचा सीमाभागाला धोका निर्माण झाल्याने या गावातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. ...
कोल्हापूरसह महाराष्ट्रावर आलेले महापुराचे संकट दूर व्हावे, पूरग्रस्त नागरिकांना लवकरात लवकर या अवस्थेतून बाहेर पडता यावे, अशी दुआ करीत मुस्लिम बांधवांनी सोमवारी बकरी ईदचे नमाज पठण केले. यानंतर अनेकांनी पूरग्रस्तांना धान्यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप ...