परभणीतून मदत :पूरग्रस्तांसाठी सरसावले हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 11:52 PM2019-08-12T23:52:08+5:302019-08-12T23:52:44+5:30

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत अडकलेल्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी परभणी जिल्ह्यातून अनेकांनी पुढाकार घेतला आहे़ काही सामाजिक संस्था तसेच नागरिकांनी समोर येत पूरग्रस्तांसाठी मदत जमा केली असून, थेट आर्थिक स्वरुपात तसेच वस्तू स्वरुपातील मदत कोल्हापूर, सांगलीकडे रवाना केली जात आहे़

Assistance from Parbhani: A handshake for flood victims | परभणीतून मदत :पूरग्रस्तांसाठी सरसावले हात

परभणीतून मदत :पूरग्रस्तांसाठी सरसावले हात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत अडकलेल्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी परभणी जिल्ह्यातून अनेकांनी पुढाकार घेतला आहे़ काही सामाजिक संस्था तसेच नागरिकांनी समोर येत पूरग्रस्तांसाठी मदत जमा केली असून, थेट आर्थिक स्वरुपात तसेच वस्तू स्वरुपातील मदत कोल्हापूर, सांगलीकडे रवाना केली जात आहे़
मागील आठवडाभरापासून कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे़ अनेक जण या पुरात अडकल्याने त्या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे़ पुरामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे़ अन्न, पाण्याबरोबरच आरोग्याचे प्रश्नही निर्माण झाल्याने या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी परभणी जिल्ह्यामधून अनेक सेवाभावी नागरिकांनी पुढाकार घेतला आहे़ येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, चतुरंग प्रतिष्ठान परभणी, मॉडेल इंग्लिश एज्युकेशन सोसायटी, शारदा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्तांसाठी मदत संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे़ कांतराव देशमुख यांच्या हस्ते या केंद्राचे नुकतेच उद्घाटन झाले़ यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे समन्वयक विजय कान्हेकर, अनिल जैन, विलास पानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती़ या संकलन केंद्रात १५ आॅगस्टपर्यंत मदत संकलित केली जाणार असून, १६ आॅगस्ट रोजी ती पूरग्रस्तांना पाठविण्यात येणार आहे़ पूरग्रस्तांसाठी परभणीकर नागरिकांनी मुक्त हस्ते मदत करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले़ प्रा़ सचिन खडके यांनी सूत्रसंचालन केले़ विजय कान्हेकर यांनी प्रास्ताविक केले़ कार्यक्रमास बालासाहेब फुलारी, रुस्तूमराव कदम, श्रीराम गर्जे, गंगाधर गायकवाड, धर्मराज शेजूळ, डॉ़ प्रशांत मेने, प्रा़ बी़पी़ कालवे, एकनाथराव मस्के, के़डी़ जाधव, प्रा़ डॉ़ भगवान पाटील, नितीन बावळे, डॉ़ रमेश भालेराव, विष्णू वैरागड, प्रा़ डॉ़ हनुमंत शेवाळे, प्रा़डॉ़ दत्ता चामले, प्रा़ डॉ़ अविनाश पांचाळ, प्रा़ श्याम पाठक आदींची उपस्थिती होती़
शिक्षकांनीही घेतला पुढाकार
४पूरग्रस्तांसाठी येथील शिक्षकांनीही मदतीसाठी कंबर कसली आहे़ सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करीत ही मदत जमा करण्यात आली़ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ गेट परिसरात जीवन उपयोगी वस्तू एकत्र करण्यासाठी मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे़ बिस्कीट, फरसाण, राजगिरा लाडू, साबण, सॅनिटरी नॅपकीन, धान्य, तेल, कपडे, ब्लँकेट, साड्या, स्वेटर अशा स्वरुपात ही मदत जमा करून त्याचे पॅिक ंग करण्यात आले आहे़
४तसेच पैशांच्या स्वरुपात जमा झालेल्या मदतीतून जीवन उपयोगी साहित्य खरेदी केले जाणार आहे़ मंगळवारी सकाळी हे साहित्य कोल्हापूरकडे पाठविले जाणार असल्याची माहिती देण्यात आली़ निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, तहसीलदार विद्याचरण कडावकर, कुलगुरु डॉ़ अशोक ढवण, डॉ़ केदार खटींग, डॉ़ मारोती हुलसुरे, रणजित कारेगावकर आदींनी या ठिकाणी भेट देऊन मदत देऊ केली़
४या उपक्रमात अजय महाजन, संतोष चव्हाण, देवानंद शेटे, शरद लोहट, प्रा़ डॉ़ जयंत बोबडे, युवराज गरुड, सुनील कदम, गजानन चोपडे, सचिन गायकवाड, प्रल्हाद चव्हाण, प्रेमदास राठोड, ज्योती चौंढे, अर्चना पावडे, सविता भाले, श्रेया बोबडे, सविता बोधने, राजश्री बनाळे, उषा मोतीपवळे, संजना लोकरे, जयश्री कदम आदींनी सहभाग नोंदविला़

Web Title: Assistance from Parbhani: A handshake for flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.