कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं. Read More
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा ‘भारत’ हा सिनेमा येत्या ५ जूनला ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांत झळकणार आहेत. साहजिकच भाईजानच्या चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचलीय. ‘भारत’च्या सेटवरचे हे फोटो पाहून चाहत्यांची उत्कंठा आणखी वाढणार आहे. ...
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर नेहमी लिंकअपच्या वृत्तांमुळे चर्चेत असतो. कतरिना कैफसोबतच्या ब्रेकअपनंतर रणबीर आता आलिया भटसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे बोलले जाते. ...
नात्यातील अनेक चढऊतारानंतरही त्यांची मैत्री आजही टिकून आहे. कदाचित याच मैत्रीखातर सलमानने पुन्हा एकदा कतरीनाला मदतीचा हात देऊ केला आहे. होय, कतरीनाची बहीण ईसाबेल कैफ हिला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याची जबाबदारी सलमानने आपल्या खांद्यावर घेतली आहे. ...
सलमान खान व कतरीना कैफ स्टारर ‘भारत’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. याचदरम्यान आज ‘भारत’चे ‘जिंदा’ हे गाणे लॉन्च करण्यात आले. अर्थात चित्रपटातील या गाण्यापेक्षा या गाण्याच्या लॉन्च इव्हेंटची अधिक चर्चा झाली. ...