कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं. Read More
Bipasha Basu And Katrina Kaif: बिपाशा बासू आणि कतरिना कैफ यांच्यातही ३६चा आकडा होता. बिपाशा आणि कतरिना यांचे चांगले संबंध नव्हते. बिपाशा बसूने कतरिना कैफबद्दल एक वक्तव्यही केले होते, जे सध्या चर्चेत आहे. ...
katrina kaif vs aishwarya rai net worth : कतरिना कैफ आणि ऐश्वर्या राय या दोघीही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्री. दोघांनीही बॉलिवूडमध्ये हिट चित्रपट देत प्रसिद्धी आणि पैसा कमावला ...