माेदी म्हणाले की, नव्या वर्षाची या प्रक्षेपणामुळे उत्तम सुरुवात झाली आहे. हे प्रक्षेपण अंतराळ संशोधन क्षेत्रासाठी उत्तम घटना आहे असे सांगून त्यांनी अंतराळ संशोधन क्षेत्रात भारताला नव्या उंचीवर नेत असल्याबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. ...
गतवर्षी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अवकाश यान उतरविणारा भारत हा पहिला देश ठरला होता. त्यानंतर आता एक्स्पोसॅट नावाचा उपग्रह प्रक्षेपित करून भारताने अवकाश संशोधनात आणखी एक पाऊल टाकले आहे. ...
‘एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह (एक्स्पोसॅट) हे अंतराळातील तीव्र क्ष-किरण स्रोतांच्या ध्रुवीकरणाची तपासणी, कृष्णविवरासारख्या गूढ रचनांचे रहस्य शोधण्याचे काम करील. हे संशोधन करणारा हा भारताचा पहिला उपग्रह आहे, असे इस्रोने म्हटले आहे. ...
अनेक देश अंतराळातील पर्यटनाचे प्रयोग करत आहेत. इतर देशांच्या तुलनेत स्वस्त आणि सुरक्षित अंतराळ पर्यटनाचा पर्याय आपण देऊ, असे सोमनाथ यांनी सांगितले. ...