मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली. Read More
IND vs ENG, 2nd T20 : Ishan Kishan पदार्पणाच्या सामन्यातच इशान किशननं ( Ishan Kishan) धमाका उडवला. लोकेश राहुल ( KL Rahul ) सोबत पहिल्याच सामन्यात सलामीला खेळण्याची संधी मिळाल्याचं दडपण न घेता त्यानं बेधडक फटकेबाजी केली. ...