IND vs ENG, 4th T2O : लोकेश राहुल संघात कायम, इशान किशनला दुखापत, टीम इंडियात दोन बदल; इंग्लंडनं जिंकली नाणेफेक

IND vs ENG, 4th T2O : England have won the toss,  नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूनं लागला आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 06:39 PM2021-03-18T18:39:16+5:302021-03-18T18:49:41+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG, 4th T2O : England have won the toss, Suryakumar Yadav and Rahul Chahar come in Playing XI | IND vs ENG, 4th T2O : लोकेश राहुल संघात कायम, इशान किशनला दुखापत, टीम इंडियात दोन बदल; इंग्लंडनं जिंकली नाणेफेक

IND vs ENG, 4th T2O : लोकेश राहुल संघात कायम, इशान किशनला दुखापत, टीम इंडियात दोन बदल; इंग्लंडनं जिंकली नाणेफेक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ind Vs Eng 4th T20 Live Update Score : मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाला आजचा सामना जिंकावाच लागेल आणि त्यासाठी कर्णधार विराट कोहलीला ( Virat Kohli) चूका टाळून काही कठोर निर्णय घेण्याची गरज होती.  नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूनं लागला आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. तीन सामन्यात तीन सामन्यांत १, ०, ० अशी कामगिरी करणाऱ्या लोकेश राहुलला ( Virat Kohli on KL Rahul) विराटनं संधी दिली आहे. पण, टीम इंडियानं आज संघात दोन बदल केले आहेत. IPL 2021 : मुंबई इंडियन्सला मोठा फटका; पाकिस्तानमुळे लागली वाट, जाणून घ्या नेमकं काय झालं

मागील तीन सामन्यांत भारतीय संघानं, शिखर धवन-लोकेश राहुल, इशान किशन-लोकेश राहुल आणि रोहित शर्मा- लोकेश राहुल अशा तीन वेगवेगळ्या जोड्या सलामीला खेळवून पाहिल्या. पण, तीनही सामन्यात लोकेश राहुल अपयशी ठरूनही कायम राहिला.  पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडनं २-१ अशी आघाडी घेतली आहे आणि आजचा सामना टीम इंडियाला मालिका वाचवण्यासाठी जिंकावाच लागेल. युझवेंद्र चहल व इशान किशन यांच्याजागी आजच्या सामन्यात सूर्यकुमार यादव ल राहुल चहर यांना संधी मिळाली आहे. इशानला दुखापत झाल्याचे विराटनं सांगितले. टीम इंडियाच्या 'फिटनेस'मागे इंग्लंडचा हात?, वीरेंद्र सेहवागनं सांगितला १० वर्षांपूर्वीचा मजेशीर किस्सा


England Playing XI:  जेसन रॉय, डेवीड मलान, जॉनी बेअरस्टो, इयॉन मॉर्गन, बेन स्टोक्स, सॅम कुरन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदील राशिद, मार्क वूड

India Playing XI : रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, राहुल चहर 


Web Title: IND vs ENG, 4th T2O : England have won the toss, Suryakumar Yadav and Rahul Chahar come in Playing XI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.