येत्या दोन वर्षांत सदरचे काम पूर्ण करण्याचे आदेश जलसंपदा विभागाने दिले असून, त्यासंदर्भातील शासन आदेश जारी करण्यात आला आह. हरणबारी धरणातून मोसम नदीत सुटणारे पाणी बागलाण तालुक्यातील सोमपूर येथे अडविण्यासाठी ब्रिटिश कालीन बंधारा आहे. ...
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत जिंतूर तालुक्यातील ६६ पाझर तलावांसाठी राज्य शासनाने ९ कोटी १८ लाख रुपयांच्या निधी वितरणास मंजुरी दिली असून, या सर्व पाझर तलावांची कामे पूर्ण झाली आहेत़ ...
हरणबारी वाढीव उजवा कालवा व केळझर वाढीव कालवा क्रमांक आठच्या कामांचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री विजय शिवतारे व प्रधान सचिव सुर्वे यांनी दिल्याची माहिती बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी दिली. ...
वाशिम : जिल्ह्यातील लघूसिंचनचे चार उपविभाग व सहा सिंचन शाखांतर्गत एकंदरित १९२ पदांना मंजूरी आहे. प्रत्यक्षात मात्र ९३ पदेच भरलेली असून तब्बल ९९ पदे रिक्त असल्याने कामे प्रभावित होत आहेत. ...
राज्यात जलयुक्त शिवार योजना यशस्वीपणे राबविण्यात येत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत झाली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी केले. ...