बुलडाणा: सिंचन घोटाळ््यातील जिगावसह बुलडाणा जिल्ह्यातील संशयाच्या भोवर्यात असलेल्या चार प्रकल्पांपैकी दोन प्रकल्पांची चौकशी पूर्णत्वास गेली असून त्याचा अंतिम अहवाल हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. ...
अकोला: अमरावती विभागातील यवतमाळ जिल्हा वगळता हिंगोलीचा समावेश करून या जिल्ह्यांमध्ये असलेल्या सिंचनाच्या अनुशेषावर निर्णय घेण्यासाठी वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या सिंचन विहिरींची देयके काढण्यावरुन व नव्या सिंचन विहिरींना मंजुरी देण्यावरुन जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अधिकाºयांना सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले. ...
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत परभणी तालुक्यातील साडेगाव येथे १ कोटी २० लाख रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यांच्या कामातील निकृष्टता चव्हाट्यावर आली असून वर्षभरातच या बंधाºयाला भेगा पडल्याची बाब सोमवारी पथकाने केलेल्या तपासणीत उघडकीस आली ...
अकोला: आर्थिक वर्ष संपत आले असताना जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना पुरेसा निधी उपलब्ध झाला नसून, बळीराजा जलसंजीवनी योजनेचा निधीही कागदावरच असल्याने, यावर्षीही पूर्णा बॅरेजसह इतर प्रकल्पांच्या कामावर परिणाम होणार आहे. ...