वाईट विचारांचं, अपप्रवृत्तीचं दहन व्हावं या हेतूने दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळीची पूजा आणि होळीचं दहन करण्याची परंपरा वर्षानुवर्षं चालत आली आहे. राज्याच्या आणि देशाच्या विविध भागांमध्ये हा सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. होळीनंतर दुसऱ्या दिवशी सारे जण धुळवडीच्या रंगात रंगून जातात आणि हवेदावे विसरून एक होतात. Read More
सूरगाव येथे रंगाविना धुळवड साजरी केली जाते. मागील २१ वर्षांची परंपरा कायम ठेवत यानिमित्त आयोजित तीन दिवसीय प्रबोधनपर कार्यक्रमाचा समारोप धुळवडीला करण्यात आला. ...
शुक्रवारी रंगपंचमीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी ८३९ मद्यपि चालकांची झिंग उतरवली. धक्कादायक म्हणजे, यात रुग्णवाहिका व स्कूल व्हॅनचालकाचाही समावेश होता. ...
अतिउत्साहाचा सण असलेल्या होळी आणि धुळवड हे दोन्ही दिवस काहींसाठी नीरस ठरले. रंगाचा संसर्ग झालेले, हाणामारीत व किरकोळ अपघातात जखमी झालेल्या एकूण १५० जणांवर मेडिकल व मेयो रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती आहे. खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग् ...
तालुक्यातील बंजारा समाजाने आपली परंपरा जपत यावर्षी होळी आणि रंगपंचमीचा सण आधुनिकतेची जोड देवून साजरा केला. ‘छोरा काढवे गेरणी धुंड करिया’ असे गात समाजबांधव रंगपंचमीच्या रंगात न्हाऊन गेले. ...
रंगोत्सवात बेधुंद होऊन रंगाचा बेरंग करणाऱ्यांना पोलिसांनी चाप लावला. होळी व रंगपंचमी सण शांततेत व सुरक्षित वातावरणात व्हावा, यासाठी गुरूवारपासून संपूर्ण शहर व जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त तैनात होता. ...