राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
सिन्नर : सोनांबे येथे युवाशक्ती पॅनलने सर्व ११ जागांवर विजय मिळवताना ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य केरू पवार यांच्या नेतृत्वातील समर्थ व भाजपचे कार्यकर्ते रामनाथ डावरे यांच्या नेतृत्वातील ग्रामविकास पॅनलला ए ...
पाथरे : पाथरे खुर्द ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नऊ जागांसाठी १९ उमेदवारांमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत आपला पॅनलच्या सात उमेदवारांनी बाजी मारली, तर ग्रामविकास पॅनलला फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले. ...
नायगाव : सिन्नर तालुक्यातील ब्राम्हणवाडे येथील ग्रामपंचायतीत ग्रामविकास पॅनेलने नऊ जागा जिंकत वर्चस्व निर्माण केले तर माजी उपसरपंच सुनील गिते यांच्या आदर्श ग्रामविकास पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही. ...
देवपूर : सिन्नर तालुक्यातील देवपूर ग्रामपंचायत निवडणुकीत युवा शिवसेना नेते राजेश गडाख, पंचायत समितीचे माजी सभापती चांगदेव गडाख यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलने सर्व ११ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. ...
नायगाव : सिन्नर तालुक्यातील जायगाव येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी यंदा तरुणांना संधी देत त्यांच्यावर गावगाड्याची जबाबदारी सोपविली आहे. यामध्ये एकाच घरातील सासू-सून यांनी ग्रामपंचायतीत प्रवेश केल्याने पंचक्रोशीत तो एक चर्चेचा विषय बनला आहे ...
वसंत तिवडे त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा वरचष्मा राहिला आहे. तीन ग्रामपालिकांपैकी पेगलवाडी ही मोठी ग्रामपंचायत आहे. तिन्ही ठिकाणी सरपंचपदासाठी आता चुरस बघायला मिळणार आहे. ...
मालेगाव : तालुक्यातील प्रती जेजुरी समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र चंदनपुरीच्या ग्रामपंचायत निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागून होते. गेल्या दशकापासून चंदनपुरी ग्रामपंचायतीवर शिवसेनेने भगवा फडकवला आहे. सत्ताधारी व सहकारी गटांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने ...
येवला : तालुक्यातील धामोडे ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन विकास पॅनलने ९ पैकी पाच जागा मिळवून सत्ता हस्तगत केली आहे. तर प्रतिस्पर्धी शेतकरी विकास पॅनलला चार जागा मिळाल्या आहेत. ...