‘त्या’  गावांचा कारभार आता तरुणांच्या हाती; मतदारांची तरुणांना पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 12:01 AM2021-01-25T00:01:16+5:302021-01-25T00:01:37+5:30

राजकीय जीवनातील ग्रामपंचायत सदस्य ही पहिली पायरी मानली जाते. त्यांच्यातील गावाच्या विकासाच्या संकल्पना आता सत्तेत उतरणार आहेत.

The management of ‘those’ villages is now in the hands of the youth; Voters prefer youth | ‘त्या’  गावांचा कारभार आता तरुणांच्या हाती; मतदारांची तरुणांना पसंती

‘त्या’  गावांचा कारभार आता तरुणांच्या हाती; मतदारांची तरुणांना पसंती

Next

सुनील घरत

पारोळ : कोरोनाचे नियम पाळत ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. मतदारांनीही कोरोनाला बाजूला सारत, लोकशाहीच्या या उत्सवात भाग घेत मतदान केले. वसई तालुक्यात सत्पाळा व पाली या दोन ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक पार पडली, पण यावेळी मात्र मतदारांनी तरुण उमेदवारांवर विश्वास टाकत त्यांना निवडून दिले. हेच तरुण कारभारी आता गावाचा कारभार करण्यासाठी सज्ज झाले आहे. सर्वात तरुण २६ वर्षांच्या उमेदवाराला सत्पाळा गावातील गावकऱ्यांनी निवडून दिले आहे.

नवीन वर्षातील ही पहिली निवडणूक असल्याने, सर्व राजकीय पक्षांनी पाली व सत्पाळा ग्रामपंचायत निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले होते. कोरोनाच्या काळात मुदत संपलेल्या पालघर जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. पालघर तालुक्यातील सांगावे तर वसईतील पाली आणि सत्पाळा या ग्रामपंचायतींचा यात समावेश होता. ग्रामपंचायत सत्तेत या वर्षी निवडून आलेल्यांत तरुणांचा वाटा मोठा आहे. यात महिलांचाही मोठा वाटा आहे. राजकीय जीवनातील ग्रामपंचायत सदस्य ही पहिली पायरी मानली जाते. त्यांच्यातील गावाच्या विकासाच्या संकल्पना आता सत्तेत उतरणार आहेत.

सरपंच लाभणार तरुण? 
यावेळी निवडणुकीत अनेक राजकीय पक्षांनी गावातील तरुणांना संधी देत, त्यांना राजकारणाची वाट मोकळी करून दिली. आता सरपंचदाचे नवीन आरक्षण जाहीर होणार असल्याचे यात नक्कीच तरुण उमेदवारांचा सरपंच म्हणून विचार होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

महत्त्वाची निवडणूक 
विधानसभा निवडणुकीनंतर कोरोनामुळे कोणतीही निवडणूक झाली नव्हती. त्यानंतरची ग्रामपंचायत निवडणूक पहिली ठरली. त्यामुळे सर्व राजकीय पक्षातील कार्यकर्ते यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची होती. राजकीय पक्षांनाही निवडणूक जिंकण्यासाठी मोठे हातपाय मारावे लागले. 

मतदारांनी आमच्यावर टाकलेला विश्वास आम्ही पूर्ण करून, गावात जी काही विकासकामे आहेत, ती करण्याचा प्रयत्न करू, तसेच गावातील समस्या आहेत, त्यांचे निवारण करणे आमचे प्रथम प्राधान्य असेल. - रोहित प्रकाश म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य, पाली.

गावच्या विकासकामांना गती देऊ. गावातील गटारे, पाणी समस्या किंवा रोड लाइट असेल, अशी कामे आम्ही पूर्ण करू, तसेच महिलांसाठीच्या योजना आहेत, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. वाचनालय, व्यायामशाळा यासाठीही आमचे प्राधान्य असेल.
- संगीता मेघराज भंडार,ग्रामपंचायत सदस्य, सत्पाळा

 

Web Title: The management of ‘those’ villages is now in the hands of the youth; Voters prefer youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.