बीड जिल्ह्यातील पंधरा वाळूपट्ट्यांचे लिलाव एप्रिलमध्ये होण्याचे संकेत मिळत आहेत. यात बीड, माजलगाव आणि अंबाजोगाई तालुक्यातील वाळू पट्ट्यांचा समावेश आहे. हे लिलाव लवकर झाल्यास वाळू उपलब्ध होईल तसेच बांधकामांना वेग येईल असे मानले जात आहे. ...
गोदावरी नदीच्या उजव्या कालव्याच्या मार्गावर आता प्रवासी वाहतूक करण्याची तयारी महापालिकेने केली असून, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तसे सूतोवाच केले आहे. सध्या या कालव्याच्या जागेचे मोजमाप तसेच अतिक्रमणांची माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू अस ...
एकलहरे गंगावाडी येथील गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणवेली साचल्याने डासांचा उपद्रव वाढला आहे. गोदावरी नदीपात्र स्वच्छ करून परिसरात धूर फवारणी करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. ...
मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी ‘डाटा’ कलेक्शनचे काम सुरू झाले असून, इस्रायलमधील शासकीय कंपनी मेकोरॉटच्या दोनसदस्यीय शिष्टमंडळाने गोदावरी विकास महामंडळ, वाल्मी आणि विभागीय आयुक्तालयात ग्रीडच्या अनुषंगाने प्राथमिक बैठका घेतल्या. ...
ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवू लागली असतानाच गोदावरी नदीच्या पात्रात पाणवेली पसरल्याने पाणी दूषित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गोदावरी नदीपात्र पाणवेलींमध्ये गडप झाले असून, पाणवेलींचे क्षार पाण्यात मिसळत असल्याने पाण्याला बेरंग आला आहे. ...
जुलै २०१६ मध्ये महापुरात उद््ध्वस्त झालेल्या ‘गोदापार्क’चे नव्याने डागडुजीचे काम सुरू झाले असून, महापुरात पुन्हा मोठे नुकसान होणार नाही, यादृष्टीने नव्याने डिझाइन तयार करण्यात आले आहे. रिलायन्स कंपनीच्या सीएसआर उपक्रमांतूनच सदर काम पुन्हा हाती घेण्या ...
हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडव्याचे पारंपरिक पद्धतीने जल्लोषात स्वागत करण्यासाठी नववर्ष स्वागतयात्रा समितीतर्फे जय्यत तयारी करण्यात आली असून, त्याअंतर्गत गोदाघाटावरील गौरी पटांगणावर महारांगोळी रेखाटण्यात आली. ...
नाशिक : हिंदू नववर्षाला गुढीपाडव्यापासून प्रारंभ होत आहे. हिंदू नववर्षाच्या वातावरण निर्मितीसाठी शंभर नव्हे, दोनशे नव्हे, तर तब्बल दोन हजार तरुण वादकांचा समूह गोदाकाठावर बुधवारी (दि. १४) एकत्र जमला. एक हजार ढोल, २०० ताशे आणि २१ टोलच्या आधारे विविध ता ...