नियमानुसार झाडाला पाणी शोषून घेता येईल एवढी जागा साेडणे गरजेचे आहे. त्यासाठी एक ते दीड मीटर जागा साेडावी आणि बुंध्याभाेवती कठडे बनविणे गरजेचे आहे. मात्र बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराकडून नियमांची ऐसीतैशी केली जात असल्याचे कुळकर्णी यांनी सांगितले. ...
काल मंगळवारनंतर आज दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसासह गारपीटीने जिल्ह्याला झोडपून काढले. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मळणी केलेले धान पिकांचे पोते पावसात भिजले तसेच रब्बी पिकाचे व बागायत शेतीचे प्रचंड नुकसान झाले. ...
मंगळवारी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. काही ठिकाणी अनेक घरांचे कौल व पत्रेदेखील उडून गेले. ...
वन्यप्राण्यांवरील परिणाम मोजण्यासाठी नीरीने ताडोबाच्या जंगलात सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. यामध्ये ताडोबा परिसरातील हवा, पाण्याची गुणवत्ता, ध्वनी आणि प्रकाशाचे प्रदूषण, जैविक परिणाम असा विविध प्रकारे अभ्यास करण्यात येणार आहे. ...
रविवारच्या अभियानात आय-क्लिन नागपूरच्या कार्यकर्त्यांनी अंबाझरी तलाव परिसरातून तब्बल १५ बॅग कचरा काढला. यात खर्रा, गुटख्याचे पाऊच, प्लास्टिक बाॅटल, चाॅकलेटचे रॅपर व स्नॅक्स बॅग्जचा कचरा अधिक प्रमाणात होता. ...
वणी शहरात निर्गुडा नदीच्या काठावर दोन्हीही बाजूने नव्या वसाहती तयार झाल्या आहेत. या वसाहतीतील अतिशय घाण पाणी नदीकडे वळविण्यात आले असून हे पाणी नियमितपणे नदीच्या पाण्यात मिसळत आहे. ...