या महिन्यातील आगामी जीएसटी परिषद बैठकीत केंद्राकडून राज्यांना द्यावयाच्या भरपाईच्या मुद्द्यावर तीव्र मतभेद होण्याची शक्यता आहे. आश्वासित भरपाई मिळण्यास केंद्राकडून होत असलेल्या उशिराबाबत राज्य सरकारांकडून सातत्याने तक्रारी करण्यात येत आहेत. ...
चीनबाहेर भारतामध्ये टिकटॉक अॅपचे वापरकर्ते सर्वाधिक (जगाच्या तुलनेमध्ये ३०.३ टक्के) असून, त्यांच्याकडून या अॅपचा वापर बंद झाल्यामुळे त्याच्या उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता याबाबत चीनमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात व्यक्त करण्य ...
कर्ज काढण्याचा सल्ला देणारे चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याच पक्षाचे सरकार केंद्रात आहे. केंद्राने महाराष्ट्राला मदत केली पाहिजे, अशी मागणी करण्याऐवजी कर्ज काढून शेतकऱ्यांना द्या, असा सल्ला देणे म्हणजे केवळ राजकारण करणे होय. ...
प्राप्तिकर खात्याने ८ एप्रिल ते ३० जून या कालावधीमध्ये प्रत्येक मिनिटाला ७६ विवरणपत्रांचा परतावा दिला आहे. वरील कालावधीमध्ये असलेल्या कामकाजाच्या ५६ दिवसांमध्ये २०.४४ लाख विवरणपत्रांची छाननी करीत ६२ हजार ३६१ कोटी रुपयांचा परतावा दिला आहे. ...
दोन महिन्यांहून अधिक काळ लॉकडाऊ न असतानाही संसर्ग थांबू शकलो नाही, तर आता चार दिवस, सात दिवस वा दहा दिवस संचारबंदी आणि निर्बंध यांमुळे रुग्णवाढ थांबेल का, असा प्रश्न कामगारांपासून व्यावसायिकांपर्यंत सारेच विचारत आहेत. ...
पहिले ७२ दिवसांचे लॉकडाऊन केले, तेव्हा सरकारने उपाययोजना करायला हव्या होत्या. सरकारला तेव्हाच कळले होते की, हजारो लोक पॉझिटिव्ह निघतील. पण प्रशासनाने त्याप्रमाणात विलगीकरण केंद्रे निर्माण केली नाहीत. ...
जेएनपीटी बंदराद्वारे २ लाख ८९ हजार २९२ टीईयूची हाताळणी करण्यात आली आहे. ही कामगिरी मे २०२०च्या तुलनेत ५.२९ टक्के अधिक आहे. जून महिन्यात १६६ मालवाहू जहाजे जेएनपीटीमध्ये आली. ...