उजनी धरणाच्या पाणी पातळीत दररोज कमालीची घट होत आहे. धरण सध्या मायनस ५७ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे उजनी धरणावर अवलंबून असलेल्या ४१ विविध योजनांपैकी जवळपास सर्वच योजना आता बंद करण्यात आल्या आहेत. ...
सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी कमी झाल्याने कोयनेतून पाणी विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या विमोचक द्वार आणि पायथा वीज गृहातून एकूण २६०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. ...
पाण्याअभावी दक्षिण सोलापूर तालुक्यातील ८ हजार एकर क्षेत्रावरील द्राक्ष बागांची छाटणी खोळबली असून यंदा द्राक्ष बागायत दारावर मोठे आर्थिक संकट कोसळण्याची चिन्हे दिसत आहेत. द्राक्ष उत्पादक शेतकरी या परिस्थितीने हवालदिल झाले आहेत. ...