Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Chara Depo राज्यात १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा चारा; शासनाने घेतला हा मोठा निर्णय

Chara Depo राज्यात १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा चारा; शासनाने घेतला हा मोठा निर्णय

Chara Depo enough fodder in the state till July 15; This is a big decision taken by the government | Chara Depo राज्यात १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा चारा; शासनाने घेतला हा मोठा निर्णय

Chara Depo राज्यात १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा चारा; शासनाने घेतला हा मोठा निर्णय

राज्यात दुष्काळ जाहीर केलेल्या ४० तालुक्यांतील पशुधन वाचविण्यासाठी तातडीने चारा डेपो सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हे चारा डेपो ३१ ऑगस्टपर्यंत सुरू राहतील.

राज्यात दुष्काळ जाहीर केलेल्या ४० तालुक्यांतील पशुधन वाचविण्यासाठी तातडीने चारा डेपो सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हे चारा डेपो ३१ ऑगस्टपर्यंत सुरू राहतील.

शेअर :

Join us
Join usNext

मुंबई : राज्यात दुष्काळ जाहीर केलेल्या ४० तालुक्यांतील पशुधन वाचविण्यासाठी तातडीने चारा डेपो सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हे चारा डेपो ३१ ऑगस्टपर्यंत सुरू राहतील.

दुष्काळी भागात तातडीने चारा, पाणी व अन्य सोयीसुविधा उपलब्ध करून जनतेला दिलासा देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासनास दिले होते.

पशुधनाची संख्या, चारा टंचाईची तीव्रता, पशुसंवर्धन विभागाचा अहवाल विचारात घेऊन चारा डेपोसाठी गावे निश्चित केली जाणार आहेत. स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन गावांची संख्या कमी अधिक करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

या डेपोंचे संचालन सहकारी संस्था, कृषी उत्पन्न बाजार समित्या, दूध खरेदी-विक्री संघ, इतर सेवाभावी संस्था, तसेच चारा छावण्या ज्या संस्थांमार्फत चालविल्या जातात त्यांनाच डेपो चालविण्यास देण्यात येणार आहेत. चाऱ्याचे नुकसान झाल्यास ती रक्कम जिल्हाधिकाऱ्यांनी डेपो चालकांकडून वसूल करावी, असा या निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

राज्यात ५१२ टन हिरवा चारा
सध्या राज्यात ५१२. ५८ टन हिरवा चारा उपलब्ध असल्याचा अहवाल पशुसंवर्धन विभागाने दिला आहे. पशुधनाचा विचार करता हा चारा १५ जुलैपर्यंत पुरेल असे विभागाचे म्हणणे आहे. तसेच १४४.४५ टन वाळलेला चारा उपलब्ध असून, तो ३० जूनपर्यंत पुरेल. तरीही दुष्काळी परिस्थिती विचारात घेता काही भागात चाराटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे चारा डेपो सुरु करण्यात येणार आहेत.

अधिक वाचा: Livestock Vaccination शेतकऱ्यांनो, जनावरांना मान्सूनपूर्व लसीकरण करून घ्या?

Web Title: Chara Depo enough fodder in the state till July 15; This is a big decision taken by the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.