धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
Ajit Pawar : जन सन्मान यात्रेची माजलगावमध्ये सभा झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी भाषण सुरू असतानाच जोरजोरात घोषणाबाजी केली. भाषणात व्यत्यय निर्माण झाल्याने अजित पवार संतापले आणि कार्यकर्त्यांना झापले. ...
Mla Laxman Pawar News : भाजपचे बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी विधानसभा निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा केली आहे. त्यांनी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दलची खदखदही व्यक्त केली आहे. ...
NCP SP Group Bajrang Sonawane News: लोकसभेप्रमाणेच आता विधानसभा निवडणुकीचा निकाल लावण्यास बीड जिल्ह्यातील जनता उत्सुक आहे, असे बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे. ...