धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
भाजप विरोधी मतांचे विभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षांना एकत्र यावेच लागणार आहे. काही मुद्यांमुळे अशोक चव्हाण यांना मनसे अडचणीची वाटत असली तरी, आम्ही काँग्रेसची मर्जी राखूनच राज ठाकरेंना महाआघाडी सोबत घेऊ, असे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी ‘लोक ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मनसेला सोबत घेण्याचा कुठलाही विचार नाही. राज आणि मी भेटतो, याचा अर्थ आम्ही पक्ष म्हणून एकत्र येणार असा होत नाही. ...
२०१४च्या निवडणुकीआधी पवारांनी स्वतःहून निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे त्यांनी पुन्हा लोकसभा लढवावी का, यावरून मतमतांतरं आहेत. ...
भारतासह अनेक देशांनी कडक पाऊल उचलल्यावर कंपनीने ही कारवाई केली आहे. विरोधी पक्षनेत्याच्या पीआरओच्या फोनवर नजर ठेवणं, त्यांचा नंबर बॅन करणं, त्यांच्या फोनवर बंदी आणणं, म्हणजे देशात आणीबाणी लागू करण्यासारखंच असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला होता. ...