धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
ताई, या विषाणूचा सामना मी दोनवेळा केलाय, यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या. ...
हाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग झालाय. औषधंसाठा, ऑक्सिजन आणि लसींचा तुटवडा भासतोय. याच मुद्द्यावरुन स्थानिक पातळीवर राजकारणही रंगलंय. बीड जिल्ह्यात कोरोना लसीच्या मुद्द्यावरुन पंकजा मुंडे, खा, प्रितम मुंडे आणि मंत्री ...
पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सध्या प्रचार शिगेला पोहोचला आहे. सत्ताधिकारी आणि विरोधकांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवली आहे, त्यातच अवकाळी पाऊस हा सभेतील चर्चेचा विषय बनला आहे. ...