धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
भीमाकोरेगाव प्रकरणाच्या दंगलीमधील आरोपी एकबोटे स्वत:हून अटक झाला. मात्र दुसरा आरोपी संभाजी भिडे याला अटक करण्यात आली नाही याचा अर्थ सरकारला दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायची आहे का असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला केला ...
परळी जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी ७० जणांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यपाल सी.विद्यासागर राव यांना भेटले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची उपस्थिती होेती. परळी जिल्हा निर्मितीबा ...
तूर, सोयाबीन, उडीद आदी कडधान्यांचे भाव अभूतपूर्व कोसळले असून कडधान्यांना जाहीर केलेला हमीभावही मिळत नाही. सरकारच्या उदासीनतेमुळे शेतक-यांचे वीस हजार कोटींचे नुकसान होणार असल्याचा दावा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. ...
रेल्वे जीएमशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आंदोलन मागे घेतल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे. त्यानंतर आता विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. ...
मुंबईत येवून अचल चौरासियाला मध्यप्रदेश पोलिस अटक करतात मग महाराष्ट्र पोलिसांना का सापडत नाही. तो पोलिसांचा जावई लागला आहे का ? आपल्या गुन्हयात पोलिसांनी चौरासियाला का मागितले नाही. याचं उत्तर मंत्री देत नाहीत. ...
बीड जिल्ह्यासह संपुर्ण राज्यातील शासकीय रूग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाला असल्याच्या मुद्दाकडे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत सभागृहाचे लक्ष वेधले. ...
राज्य लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणार्या स्पर्धा परिक्षेत मागील दोन-तीन वर्षांपासून बोगस (डमी ) विद्यार्थी बसवून निवड केली जात असल्याचे प्रकरण अतिशय गंभीर असून, या प्रकाराची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुं ...