धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
नशीब हा संघ 16 व्या शतकात नव्हता, नाहीतर यांनी छत्रपती शिवाजी महाराजही संघाचे होते, असे म्हणायला कमी केले नसते, अशी जोरदार टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नेसरी येथील जाहीर सभेत संघावर केली. ...
नवसाने मुल झालं आणि मुके घेऊन मारलं अशी परिस्थिती या सरकारची होऊ नये, अशी घणाघाती टीका विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली. हल्लाबोल यात्रेच्या चौथ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात ते बोलत होते. ...
राज्य सरकारने खरेदी केलेल्या तुरीपासून डाळ बनविण्याच्या प्रक्रियेत मर्जीतील कंपनीला टेंडर देण्यात आली. त्यामुळे दोन हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी विधानपरिषदेत केला. ...
कर्नाटक राज्याच्या संवैधानिक धर्तीवर राज्यातील लिंगायत समाजाला आरक्षण देण्याची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात केली. नियम २८९ अन्वये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात ही मागणी केली. ...
तुमचं लग्न झालं आहे का ? असा सवाल टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स ही संस्था तरुणांना करत आहे हे कशासाठी ? धनगर समाजाचा मागासलेपणा तपासण्यासाठी या प्रश्नाचा काहीच संबंध नाही ...
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावात विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह विरोधी पक्षांनी विविध खात्यांतील घोटाळ्यांचा विषय उपस्थित केला आहे. ...
पेपरफुटल्याची बातमी प्रसिद्ध केल्यावरुन वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींवरच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल केल्या प्रकरणी शासनाने गंभीर दखल घेण्याचे निर्देश विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी सोमवारी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उ ...