धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केला असला तरी ही घोषणा केवळ जी.आर. काढण्यापुरती कागदावरच राहिली असून, प्रत्यक्षात उपाययोजना मात्र शुन्यच असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. ...
दिवाळीपूर्वी ही वेतनवाढ न मिळाल्यास राज्यातील एस.टी. कर्मचारी सरकारला आणि परिवहन मंत्र्यांना दिवाळी साजरी करू देणार नाहीत. असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे. ...
विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी सुरू केलेल्या नव्या पद्धतीमुळे लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. ...
राज्यातील ऐरणीच्या दुष्काळाच्या प्रश्नावर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली. ...
मुंडेसाहेब हे वाघ होते आणि मी त्यांची कन्या वाघीण आहे. माझ्या रक्ताची हाडामासाची माणसं तुम्ही आहात. त्यामुळे मी कशालाच घाबरत नाही, असे पंकजा यांनी सावरगाव येथील दसरा मेळाव्यात बोलताना म्हटले. ...
अन्यायकारक व चुकीच्या भारनियमनाच्या विरोधात सोमवारी सायंकाळी विधान परिषद विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील वीज वितरण (पॉवर हाउस) कार्यालयावर कंदिल मोर्चा काढण्यात आला. ...