बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
Kalki 2898 ad सिनेमा आज रिलीज झालाय. प्रेक्षकांनी पहाटेपासूनच सिनेमा पाहण्यासाठी थिएटर हाऊसफुल्ल केले आहेत. सिनेमा पाहून लोकांच्या प्रतिक्रिया कशा आहेत? जाणून घ्या ...
काल मुंबईत कल्कीचा एक खास इव्हेंट पार पडला. त्यावेळी गरोदर असलेल्या दीपिकाला अमिताभ बच्चन हात देणार तोच प्रभास पुढे आला. हा धमाल व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय (amitabh bachchan, deepika padukone) ...
Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण तिच्या प्रेग्नेंसीमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. दरम्यान आता तिने बेबी बंपचा फोटो शेअर केला आहे. ...