दीपिका पादुकोणने पहिल्यांदाच शेअर केला बेबी बंपचा फोटो, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 08:21 PM2024-06-19T20:21:42+5:302024-06-19T20:22:31+5:30

Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण तिच्या प्रेग्नेंसीमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. दरम्यान आता तिने बेबी बंपचा फोटो शेअर केला आहे.

Deepika Padukone shares baby bump photo for the first time, fans are showered with love | दीपिका पादुकोणने पहिल्यांदाच शेअर केला बेबी बंपचा फोटो, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव

दीपिका पादुकोणने पहिल्यांदाच शेअर केला बेबी बंपचा फोटो, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) तिच्या प्रेग्नेंसीमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिकाने प्रेग्नेंसीची घोषणा केल्यापासून या जोडप्यांचे चाहते बाळाच्या आगमनाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. प्रत्येकजण त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. एकीकडे आनंदाने भरलेले सकारात्मक वातावरण आहे तर दुसरीकडे दीपिका पादुकोणवर बनावट प्रेग्नेंसीचा आरोप करणारे काही लोक आहेत. काही सोशल मीडिया युजर्सचे म्हणणे आहे की दीपिकाने बनावट बेबी बंप घातला आहे आणि ती स्वत: गर्भवती नाही. मात्र, या सगळ्याला उत्तर देताना दीपिकाने आज एक फोटो शेअर केला आहे.

दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आणखी काही फोटो शेअर केले आहेत आणि सोबतच लिहिले आहे की, 'पूरे झाले. मला भूक लागली आहे.' दीपिकाच्या या पोस्टवरून स्पष्ट होते की तिने अशा लोकांना प्रत्युत्तर दिले आहे जे प्रेग्नेंसीची खिल्ली उडवत होते आणि तिला टोमणे मारण्याची संधी सोडत नव्हते. दीपिकाच्या या नवीन फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये दीपिका काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. 

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर दीपिका पादुकोण रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती चांगली ॲक्शन करताना दिसणार आहे. तिने आधीच ते शूट केले आहे. सध्या, दीपिका ब्रेकवर आहे, कधीकधी ती इव्हेंट्स आणि पार्ट्यांमध्ये किंवा तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसते.

Web Title: Deepika Padukone shares baby bump photo for the first time, fans are showered with love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.