Video: गरोदर दीपिकाला हात द्यायला उठले अमिताभ; पण मध्येच आला प्रभास! पुढे काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 08:46 AM2024-06-20T08:46:46+5:302024-06-20T08:47:04+5:30

काल मुंबईत कल्कीचा एक खास इव्हेंट पार पडला. त्यावेळी गरोदर असलेल्या दीपिकाला अमिताभ बच्चन हात देणार तोच प्रभास पुढे आला. हा धमाल व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय (amitabh bachchan, deepika padukone)

Amitabh bachchan gets up to give hands pregnant Deepika padukone But Prabhas came in the middle video viral | Video: गरोदर दीपिकाला हात द्यायला उठले अमिताभ; पण मध्येच आला प्रभास! पुढे काय घडलं?

Video: गरोदर दीपिकाला हात द्यायला उठले अमिताभ; पण मध्येच आला प्रभास! पुढे काय घडलं?

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या गरोदर आहे, हे आपल्या सर्वांना माहितच आहे. गरोदर झाल्यानंतर दीपिका काल पहिल्यांदा 'कल्की' सिनेमाच्या इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. यावेळी दीपिकाचा बेबी बंप सर्वांना  दिसत होता. 'कल्की' सिनेमाची सर्व टीम दीपिकाची चांगलीच काळजी घेत होते. अशातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत दीपिका स्टेजवरुन खाली येताच तिला सावरायला अमिताभ बच्चन हात देणार तोच प्रभास त्यांच्या मध्ये आला. मग पुढे असं काही घडलं सर्वांमध्ये हशा पिकला.

दीपिकाला सांभाळायला बिग बी पुढे आले पण...

'कल्कि 2898 एडी' सिनेमाचा काल मुंबईत विशेष इव्हेंट झाला. या इव्हेंटला सिनेमातील प्रमुख कलाकार अर्थात प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण उपस्थित होते. सध्या गरोदर असलेल्या दीपिकाचा बेबी बंप इव्हेंटमध्ये स्पष्टपणे दिसत होता. दीपिकाची काळजी  सर्व कलाकार घेत होते. अशातच दीपिका जेव्हा स्टेजवरुन खाली उतरत होती तेव्हा अमिताभ पटकन तिला हात द्यायला आले. तेवढ्यात प्रभासने  नकळतपणे दीपिकाला स्टेजवरुन खाली उतरायला मदत केली. यामुळे अमिताभ यांनी प्रभासच्या पाठीवर थाप मारली. "ही संधी तू कशी मिळवलीस?" असं म्हणत अमिताभ यांनी प्रभाससोबत गंमत केली. या छोट्याश्या प्रसंगामुळे दीपिकाही खळखळून हसली.

तीन्ही सुपरस्टार कल्की सिनेमात येणार एकत्र

 जेव्हापासून दीपिका पादुकोणने गरोदर असल्याची घोषणा केलीय तेव्हापासून लोक तिच्या बेबी बंपवर लक्ष ठेवून होते. काल 19 जून रोजी तिने तीन फोटो पोस्ट केले. यात तिने तिच्या बेबी बंपसह फोटो पोस्ट करून सर्वांना थक्क करून सोडले. 'कल्कि 2898 एडी' सिनेमाच्या इव्हेंटमध्ये दीपिकाने हे खास फोटोशूट केलं. 'कल्कि 2898 एडी' सिनेमाबद्दल सांगायचं तर अमिताभ बच्चन, प्रभास, कमल हसन आणि दीपिका पादुकोण सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. २७ जूनला सिनेमा रिलीज होणार आहे.

Web Title: Amitabh bachchan gets up to give hands pregnant Deepika padukone But Prabhas came in the middle video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.