शहर व जिल्ह्यातून काही महिन्यांपूर्वीच तडीपार करण्यात आलेले असतानाही शहरात वावरणारा सराईत गुन्हेगार श्यामसिंग महावीरसिंग परदेशी (४१, रा. लक्ष्मीनारायण सोसायटी, लामखेडे मळा) यास पंचवटी पोलिसांनी शुक्रवारी (दि़ २४) पहाटे अटक केली़ ...
अन्न व औषध प्रशासन विभागाने तालुक्यातील पोटेगाव-राजुरी दरम्यान सापळा रचून सुमारे ९४ हजार ९५० रूपयांचा सुगंधित तंबाखू जप्त केला आहे. छत्तीसगड राज्यातून पोटेगाव मार्गे गडचिरोली तालुक्यात दारू आणली जात असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्य ...
येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे बनावट शिक्के तयार करून खोट्या सह्यानिशी जमिनींचे व्यवहार केल्याप्रकरणी अव्वल कारकून दुष्यंत कोवे याला शनिवारी अटक करण्यात आली. या प्रकरणात झालेली ही दुसरी तर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याची पहिलीच अटक आ ...
नजीकच्या एकुर्ली येथील कल्पना कैलास उर्फ भोला खोंड (३५) हिची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केली. या प्रकरणातील आरोपी पती कैलास खोंड याला पोलिसांनी त्याच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस करून अवघ्या काही तासात अटक केली आहे. ...
कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयातील सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवून बंधक बनविल्यानंतर कार्यालयात तोडफोड करून ६ दरोडेखोरांनी ४ लाख, ७३ हजारांची रोकड लुटून नेली. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी पहाटे ३.१५ ते ४ च्या सुमारास हा दरोडा पडला. आज ...
जुने जळगावामधील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरातील विठ्ठल व रूख्मिणी यांचे चांदीचे मुकूट व कुंडले चोरट्यांनी भरदिवसा लांबविल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली़ ...