बीड जिल्ह्यात यंदा दुष्काळ नसताना देखील शेतकरी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे देशोधडीला लागला आहे. हे अनुदान खरीप हंगामापूर्वी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
मागील काही वर्षांपासून सातत्याने कापसाचे क्षेत्र घटत चालले आहे. आता पुन्हा त्यात तब्बल २0 टक्क्यांची घट होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. तर निसर्गाच्या लहरीपणामुळे हळद, कारळे आदी पिकांकडेही शेतकरी पाठ फिरवतील, असा अंदाज आहे. ...
मागील हंगामात कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या माथी चोर बिटी बियाणे मोठ्या प्रमाणात मारण्यात आले. यामुळे कापसाच्या उत्पादनात घट होवून कापसाची प्रतवारी खराब झाल्याने कापसाचे दर घसरले. त्यामुळे जिनिंग व्यवसायी व कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे ...
ज्या जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक कापसाचे पीक घेतले जाते, अशा जिल्ह्यात सोयाबीन प्रमाणेच पीक विम्याचा हप्ता घेण्यात यावा, असा प्रस्ताव केंद्र शासन आणि कृषी विभागाकडे पाठविला आहे. ...
तामसा येथील सहकारी जिनिंग प्रेसिंगच्या सुमारे ८ एकर जागेवर प्लॉट पाडून त्याची विक्री करण्याचा सपाटा तामसा ग्रामपंचायतने चालविला आहे़ अनेकांनी कोट्यवधी रुपयांची ही जमीन स्वत:च्या खिशात घातली़ जिल्हा तथा तालुका प्रशासनाने याची दखल घेण्याची गरज आहे़ ...
खाजगी व्यापाऱ्यांकडून आडतीमधून खरेदी केलेला कापूस भर रस्त्यात वाहने उभीकरून त्यात भरणा केला जात आहे. यामुळे सतत गजबजलेल्या राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण होते. ...
जिल्ह्यात बीटी कापसाचे बियाणे पुरवठा १५ मेनंतरच करण्याची तयारी आहे. पेरणीच्या काळात बाजारात बियाणे नसल्याने शेतकऱ्यांना त्याची पेरणी करता येणार नाही. ...
कापूस हे जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. मात्र, मागील हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. यामुळे शेतकरी यंदा कपाशीऐवजी मका किंवा अन्य कडधान्यांकडे वळण्याची शक्यता आहे. परिणामी, ४ लाख ३७ हजार हेक्टर कपाशीच्या सरासरी ...