देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
लोकांनी सभांना गर्दी केली खरी, पण मतदार कौल कोणाला देणार याबाबत व्यक्त होत नव्हता. मतदारांनी थांग लागू न देणे हे नेत्यांचे टेन्शन वाढवणारे ठरले आहे. ...
काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीला लोकांचा प्रतिसाद लक्षणीय बदलला आहे आणि आघाडीच्या बाजूने मोठी छुपी लाट आहे, जी लोकसभेत बहुमत मिळवण्यापासून भाजपला रोखू शकेल, असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी व्यक्त केला. ...
बहुजन समाज पक्षाला पाठिंबा देऊन आपले मत वाया घालवू नका. लोकांनी अतिशय जागरूक राहून मतदान करावे. भाजप, बहुजन समाज पक्षाने छुपी हातमिळवणी केली आहे, हे जनतेने लक्षात घ्यावे. ...
मायावती म्हणाल्या की, या पक्षांनी उद्योगपतींच्या फायद्याची धोरणे आखली आणि देणग्या घेतल्या. भाजपच्या राजवटीत दलित, आदिवासी किंवा इतर कोणत्याही वर्गाची प्रगती झालेली नाही. ...