देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
"देशभरात 'इंडी' आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या, त्यापेक्षा जास्त एकट्या BJP ला मिळाल्या आहेत. त्यामुळे देशात तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात NDAची सत्ता स्थापन होईल." ...
Delhi Lok Sabha Election Result 2024 : 'आप'ने दिल्लीत सातपैकी चार जागांवर निवडणूक लढवली होती. पक्षाच्या मतांची टक्केवारी सुमारे ६ टक्क्यांनी वाढली पण त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. ...
Lok Sabha Election 2024: देशातील जनतेने लोकशाही वाचवली. पाशवी बहुमताच्या जोरावर संविधान बदलू पाहणारी प्रवृत्ती जनतेने हद्दपार केली असल्याची टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनी केली. ...
Lok Sabha Election Result 2024 : सत्ताधारी ‘आप’नेही ३ जागांवर विजय मिळविला आहे. तर शिरोमणी अकाली दलाला १ आणि दोन ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. ...
Maharashtra Legislative Council Election 2024: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवणाऱ्या काँग्रेसने (Congress) विधान परिषद निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला असून, कोकण पदवीधर मतदारसंघामधून काँग्रेसने रमेश कीर (Ramesh Keer) यांना उमेदवारी जाही ...