देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
योगी म्हणाले, काँग्रेसने राम मंदिराचा वाद मिटू दिला नाही. जो वाद काँग्रेसला 65 वर्षात मिटवता आला नाही. तो 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कायमचा मिटला. आज देशात ज्या काही समस्या आहेत, त्यासाठी काँग्रेस जबाबदार आहे. काँग्रेसमुळे ...
हरियाणात पक्षातील गटबाजी रोखताना काँग्रेसच्या नाकीनऊ आल्याचे दिसत आहे. काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला, या कार्यक्रमातील कुमारी शैलजा आणि रणदीप सुजरेवालांची अनुपस्थितीने चर्चेला तोंड फुटले आहे. ...
काँग्रेसने आपला जाहीरनामा जाहीर करताना, आपण सर्व घटकांवर लक्ष केंद्रित केल्याचे म्हटले आहे. तसेच, आपण मागील सरकारमध्ये दिलेली आश्वासने पूर्ण केल्याचा दावाही पक्षाने यावेळी केला आहे. ...