देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे नेते शिवराज सिंह चौहान यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख गुन्हेगार असा केल्यामुळे संतप्त काँग्रेस नेत्यांनी त्यांचा निषेध केला आहे. ...
शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याणमंत्री आशिष शेलार विधानसभेत प्रतिनिधित्व करत असलेल्या वांद्रे पश्चिम मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत शेलारांसमोर कोणाला उमेदवारी द्यावी, असा पेच काँग्रेससमोर पडला आहे. ...
कावेरी प्राधिकरणाच्या धर्तीवर कोयना व अलमट्टी धरणांचेही प्राधिकरण स्थापन करण्यात यावे. त्यात राजकीय हस्तक्षेप न करता फक्त तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश करावा. ...
सोनिया गांधी या व्यक्ती नसून संस्था आहेत. गेल्या शंभर वर्षांच्या राष्ट्रीय परंपरेच्या त्या प्रतिनिधी आहेत. मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची पुण्याई व कार्य त्यांच्या पाठीशी आहे. ...