देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
पाच वर्षात अक्षरश: लूट करणाऱ्या खोटारड्या भाजपा-शिवसेना सरकारने राज्यभरातील जनतेची दिशाभूल केली, असा आरोप काँग्रेसचे माजी खासदार नाना पटोले यांनी केला. ...
काँग्रेसबध्दल सर्वसामान्यांच्या मनांत नाराजीची भावना असली तरी आता चक्क कोल्हापूरच्या जिल्हाध्यक्षांनाच पक्षाचे ‘हात’ हे चिन्ह नको झाले आहे. त्यामुळे ते यावेळेची विधानसभा निवडणूक चक्क अपक्ष म्हणून लढवणार आहेत. ...